गोवंडीत भीषण आग, 15 झोपडय़ा जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवंडी पश्चिमेच्या बैंगणवाडी येथील झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. यामध्ये 15 झोपडय़ा जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, परिसरातील अनेक झोपडय़ा जळून खाक झाल्या असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काही झोपडय़ांना अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.