चीनला चक्रीवादळाचा तडाखा; 10 जणांचा मृत्यू, दोन शहरे उद्ध्वस्त

चीनला एका भयानक चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या चक्रीवादळात 10 जणांचा मृत्यू झाला असून दोन शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या शहरातील 137 घरांची पडझड झाली आहे. तर सुमारे 1645 इमारतींचे नुकसान झाले आहे. याआधी चीनच्या दक्षिण पूर्व भागात वादळामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आता चीनला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या चक्रीवादळात सुकियान आणि यानचेंग शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

चीनच्या भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांना चक्रीवादळाच फासरा सामना करावा लागत नाही. मात्र, आता आलेले चक्रीवादळ थोड्या वेळासाठीच होते. मात्र, त्याचे प्रंचड हानी झाली आहे. चीनच्या हवामा खात्याने वादळी वारे आणि अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. मात्र, वातावरणात अचानक बदल झाले आणि वादळी वाऱ्यांचे रुपांतर चक्रीवादळात झाले. जियांगसू भागात अनेक ठिकाणी वृक्ष आणि वीजेचे खांब उन्मळून पडले. वीजेच्या तारा तुटल्याने अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटनाही घडल्या.

सोशल मिडायावर चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यावरून या चक्रीवादळाने केलेल्या थैमानाची तीव्रता लक्षात येत आहे. या वादळाने कार आणि वीजेचे खांबही हवेत उडवून नेल्याचे दिसत आहे. सुकियान शहराला याचा सर्वाधिक तडाखा बसला असून तेथील रस्त्यांवर पडलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष दिसत आहेत. यानचेंग शहरालाही याचा तडाखा बसला असून वृक्ष उन्मळून पडले आहेत. तसेच परिसरातील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या चीनला आता चक्रीवादळानेही झोडपले आहे. वातारणातील बदल आणि जागतिक तापमानवाढीमुळे अशा घटना वाढत असल्याचे सांगण्यात आले.