स्पेनची मोरोक्कोशी बरोबरी, अंतिम १६ मध्ये प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मॉस्को

सोमवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात स्पेनला मोरोक्कोने टगडी टक्कर दिली. पहिल्या हाफमध्ये १४ व्या मिनिटाला गोल करत मोरोक्कोने स्पेनची हवा टाईट केली. खालिदने हा गोल केला. परंतु त्यानंतर पाच मिनिटांनी स्पेनच्या इस्कोने १९ व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. पहिल्या हाफपर्यंत सामना १-१ असा बरोबरीत होता.

दुसऱ्या हाफमध्ये शेवटच्या १५ मिनिटात दोन्ही संघ विजयासाठी अधिक आक्रमक झाली. स्पेनच्या ढिसाळ डिफेन्सचा फायदा उठवत मोरोक्कोच्या युसूफने ८१ व्या मिनिटाला गोल करत स्पेनचे टेन्शन वाढवले. त्यांनंतर इंज्यूरी टाईममध्ये स्पेनच्या आसपासने गोल करत संघाला बरोबरी साधून दिली आणि स्पेनच्या खेळाडूंसह प्रेक्षकांच्याही जिवात जीव आला.