
लिओनल मेस्सीने उपांत्यपूर्व फेरीच्या आधी आपले भाकीत वर्तवले असून तो आपल्या अर्जेंटिनाला फिफा वर्ल्ड कपचा संभाव्य विजेता मानतो. तसेच त्याच्या यादीत माजी जगज्जेता फ्रान्स, स्पेन आणि ब्राझील यापैकीही कुणीही जगज्जेते पद जिंकू शकतो, असा अंदाज त्याने व्यक्त केला आहे. या स्पर्धेत अंतिम चारमध्ये असलेले संघ साखळीत एकेका पराभवाला सामोरे गेले असले तरी फ्रान्स आणि ब्राझीलने बाद फेरीच्या प्रारंभी धमाकेदार खेळ केला आहे. त्यामुळे सामन्याचा दिवस आणि त्या दिवशी लाभणारी चेंडूची साथच या स्पर्धेचा जगज्जेता निश्चित करील, असेही मेस्सी म्हणाला.


























































