
सामना ऑनलाईन, मॉस्को
फिफा वर्ल्डकपच्या ‘ब’ गटातून स्पेन आणि पोर्तुगाल या बलाढय़ संघांनी मोठय़ा संघर्षानंतर अखेर बाद फेरी गाठण्यात यश मिळवले. अखेरच्या गट लढतीत स्पेनला मोरक्कोने २-२, तर पोर्तुगालला इराणने १-१ असे बरोबरीत रोखले. मात्र हीच बरोबरी उभय संघांना स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी पुरेशी पडली. ‘ब’ गटात ५ गुणांसह अव्वल स्थानी रहिलेल्या स्पेनची गाठ आता यजमान रशियाशी पडेल, तर ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिलेल्या पोर्तुगालपुढे उरुग्वेचे आव्हान असेल.
इराणचा तोडीस तोड खेळ
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ दिग्गज समजला जात असला तरी इराणसारख्या संघाने त्यांच्या तोडीस तोड खेळ करीत सामना १-१ असा बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले. ऍड्रियन सिल्वाच्या पासवर किक मारत रिकार्डोने ४५व्या मिनिटाला पोर्तुगालला १-० असे आघाडीवर नेले. ५१ क्या मिनिटाला रोनाल्डोला पेनल्टी किक मिळाली, पण इराणी गोलरक्षक अलीरजाने आपल्या डाक्या बाजूला झेप घेत चेंडू अडकला. भरपाई केळेत पोर्तुगालच्या गोलजाळ्याजकळ त्यांच्याच खेळाडूच्या हाताला चेंडू लागला आणि इराणला स्पॉट किक देण्यात आली. करीमने ही गोल करण्याची सोपी संधी दकडली नाही.
मोरोक्कोने झुंजविले
टिकीटाका खेळाच्या जोरावर २०१०च्या विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या स्पेनला दुबळ्या मोरोक्कोने चांगलेच झुंजविले. सामन्याच्या १४ क्या मिनिटाला खलिद बोऊतैबने मोरक्कोचे खाते उघडले, मात्र त्यांचा हा आनंद औटघटकेचा ठरला. कारण पाचच मिनिटांनी स्पेनच्या इस्कोने गोल करून स्पेनला बरोबरी गाठून दिली. ८१व्या मिनिटाला इन नेसयारीने गोल करून मोरोक्कोची आघाडी २-१ ने वाढवली. मात्र इऍगो ऍसपसने गोल केला म्हणून स्पेनला २-२ अशी बरोबरी करता आली.

























































