कणकवलीत राडा… दोन गटातील बाचाबाचीचे पर्यवसन राजकीय हाणामारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fight
file photo

सामना ऑनलाईन । कणकवली

महाविद्यालयातील दोन गटात झालेल्या भाडणांत राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतल्याने कणकवलीमध्ये जोरदार राडा झाला. भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले, दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. परिस्थिती आणखी चिघळण्याच्या आत पोलिसांनी नियंत्रण मिळवले. दरम्यान, कणकवलीत तणावपूर्ण शांतता असल्याचे कळते.

शहरातील महाविद्यालयात दोन गटात आज सकाळी बाचाबाची झाली. पण हळहळू या बाचाबाचीचे रुपांतर राजकीय पक्षांमधील कार्यकर्त्यांच्या हाणामारीत झाले. कणकवलीचे नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र स्वभिमान पक्षाचे नेते समीर नलावडे आणि भाजपचे नेते संदेश पारकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला. संदेश पारकर यांच्या घरासमोरील मोटरसायकलची काही जणांनी तोडफोड केली. यानंतर बराच काळ कणकवली बाजारपेठेत तणावाचे वातावरण होते.