लोकमान्य टिळक टर्मिनसवरील कँटिनमध्ये लागली आग, अग्निशमन दलाच्या जवानांकडून नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या ‘जन आहार’ कॅन्टीनमध्ये बुधवारी आग लागली. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळ हे कँटिन असून याभागात अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीचं वृत्त तात्काळ अग्निशमन दलला मिळताच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

यावेळी तेथे उपस्थित असलेले कर्मचारी आणि प्रवासी धावपळत बाहेर आले. अनेकांनी आगीच्या या घटनेचे चित्रण आपल्या स्मार्टफोनमध्ये टिपले आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ याठिकाणी दाखल झाल्या असून जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.