
भायखळ्यातील शनिवारी रात्री भीषण आग लागली होती. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.
#UPDATE: The level-I fire, that had broken out at a restaurant in Byculla area of Mumbai, has been brought under control. #Maharashtra https://t.co/EjysR929PU pic.twitter.com/GPaksSxIQu
— ANI (@ANI) November 14, 2020
मिळालेल्या माहितीनुसार भायखळ्यातील मौलाना आझाद मार्गावरील एका रेस्टॉरेंटला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री 10 वाजेपर्यंत अग्निशमन दल्याच्या 7 गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत होत्या. रात्री उशीरा ही आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.




























































