पुणे- गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत अनेक वाहनांचा कोळसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire-in-garage-pune1

सामना प्रतिनिधी । पुणे

पुण्यातील भोर तालुक्यातील सातारा रस्त्याजवळ शिंदेवाडी येथे बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका गॅरेजला आग लागली. आगीने उग्र स्वरूप धारण केले असून त्यात एका शिवशाही बससह अनेक वाहने जळून खाक झाली आहेत.

दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. गॅरेजला आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.