
सामना प्रतिनिधी । पणजी
दक्षिण गोव्यातील मडगाव येथील रेडिमेड कपड्यांच्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीत या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास ही आग लागली होती. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आंध्र बँकेखाली असलेल्या रेडिमेड कपड्याच्या दुकानातून सकाळच्या सुमारास धूर येत असल्याचे निदर्शनास आले. याची माहिती मडगाव अग्निशामक दलाला देण्यात आली. मात्र, अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. तासाभरात दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

























































