मुरुड समुद्र किनारी लागली आग, 4 बोटीसह लाखोंची मासळी जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुरुडच्या समुद्रकिनार्‍यावर बुधवारी रात्री अचानक आग लागली.  या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मच्छीमारांच्या चार बोटी जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे मासेमारी करण्यार्‍या बांधवांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

बुधवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास समुद्र किनारी अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने समुद्र किनारी कोळी बांधवांनी ठेवलेल्या बोटी या आगीच्या कचाट्यात सापडल्या. या घटनेत 3 मोठ्या बोटी तर 1 लहान बोट आगीत जळून भस्मसात झाली. या बोटींमध्ये मासेमारी करणार्‍या लाखो रुपये किमतीच्या जाळ्या जळून खाक झाल्या असून, मच्छिमार बांधवांनी समुदातून मासेमारी करून पकडलेली तब्बल 20 लाख रुपयांची मासोळीसुद्धा या आगीत जळून भस्मसात झाली. आहे. ही आग नक्की कशी लागली याचे कारण कळलेले नसून मुरुड पोलीस प्रशासन सदर घटनेची चौकशी करत आहे.