आज अकरावीची पहिली यादी, तीन नियमित फेऱ्या… मुलींकरिता विशेष पाचवी फेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी उद्या 26 मे रोजी जाहीर होईल. अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरात साडेसात लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 मेपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा भाग एक आणि भाग दोन भरून विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणीची सुविधा ‘https://mahafyjcadmissions.in’ या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली. या प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, ओपन टू ऑल चौथी फेरी, मुलींकरिता विशेष पाचवी फेरी घेण्यात येणार आहे.

प्रवेशाची नियमित कॅप आणि कोट्या अंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया एकाच वेळी सुरू राहणार आहे. राज्यातील 9589 कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत जवळपास सात लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक भरून नोंदणी केली आहे. अकरावी प्रवेशाचे शून्य फेरीचे प्रवेश संपले आहेत. आता पहिल्या नियमित कॅप फेरीची गुणवत्ता यादी, महाविद्यालय वाटप यादी, कट-ऑफ यादी 26 मे रोजी जाहीर होणार आहे.

पहिली नियमित ‘कॅप’ फेरी याप्रमाणे

  • नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्जाचा भाग एक आणि दोन भरणे, महाविद्यालयांचा प्राध्यान्यक्रम नोंदविणे – 21 ते 22 मे
  • अलॉटमेंट प्रक्रिया – 23 ते 26 मे
  • पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी, महाविद्यालय वाटप यादी, कट-ऑफ – 26 मे
  • वाटप केलेल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी मुदत, प्रवेश नाकारणे, प्रवेश रद्द करणे- 26
    ते 28 मे
  • रिक्त जागांचा तपशील प्रदर्शित करणे – 29 मे
  • दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक – 30 मे