हृतिकच्या ‘सुपर 30’ चा पोस्टर रिलीज

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता हृतिक रोशन याचा आगामी चित्रपट ‘सुपर 30’ चे पहिले पोस्टर आज रिलीज करण्यात आले. या चित्रपटात हृतिक गणिताच्या शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टर सोबत ”अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा.. अब राजा वही बनेगा दो हकदार होगा!” अशी टॅग लाईन देखील शेअर करण्यात आली आहे.

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

सिनेसृष्टीपासून बराच काळ दूर असलेला हृतिक लवकरच ‘सुपर 30’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट शिक्षक गणितज्ज्ञ आनंद कुमार व त्यांच्या 30 विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे. बिहारच्या एका खेडेगावातील विद्यार्थ्यांची आईआईटी-जेजई सारख्या कठीण परीक्षेची तयारी गणितज्ज्ञ आनंदकुमार यांनी कशाप्रकारे घेतली. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील दिसणार आहे.