आज पहिला ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट डे’; ‘बेस्ट’ जादा गाड्या सोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या माध्यमातून उद्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिला ‘पब्लिक ट्रान्स्पोर्ट डे’ साजरा करणार आहे. या उपक्रमासाठी ‘बेस्ट’ वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला आणि बीकेसीदरम्यान अतिरिक्त गाडया सोडणार आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने वांद्रे, बीकेसी आणि कुर्ला स्थानकात निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.