100 वर्ष जगायचं असेल तर आजपासूनच ‘या’ 5 गोष्टींचे सेवन सुरू करा, शास्त्रज्ञांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्याला दीर्घायुष्य मिळावे असे सर्वांनाच वाटते. परंतु सध्या बैठे काम, व्यायमाचा अभाव, फास्ट फूडचे सेवन यामुळे माणसाचे आयुष्य घटत चालले आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींचा वाईट परिणाम आपल्या शरिरावर होत असतो हे अनेक अभ्यासांमधून सिद्ध झाले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या आणि योग्य गोष्टींचे सेवन केल्यास नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि हेल्ट अँड न्यूट्रिशन एक्स्पर्ट डॉ. जेम्स डिनोकोलांटीनियो यांनी नुकत्यात आपल्या एका पोस्टमध्ये 100 वर्ष जगण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे याची माहिती दिली आहे. याबाबत ‘आज तक‘ने वृत्त दिले आहे.

कच्चा मध –

फिल्टर न करता जसा आहे तसा म्हणजेच नैसर्गिक रुपातील मधाचे सेवन करणे चांगले असते, असे डॉ. जेम्स डिनोकोलांटीनियो यांनी म्हटले आहे. या मधामध्ये असणारी पोषणमुल्य कर्करोग आणि ह्रदयाची निगडीत रोगांचा धोका कमी करतात. ‘नॅशनल लाइब्रेरी ऑफ हेल्थट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, यकृत, कोलोरेक्टल आणि स्तनाच्या कर्करोगांमध्ये कच्चा मध उपयुक्त असल्याचे दिसून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. ट्यूमर आणि कर्करोगांच्या पेशींसाठी मध हाय सायटोटॉक्सिक म्हणून काम करतो, तर सामन्या पेशींवर नॉन-सायटोटॉक्सिक म्हणून काम करतो असेही दिसून आले आहे.

शेळीच्या दुधापासून बनवलेले केफिर –

जगभरामध्ये कर्करोगांमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु शेळीच्या दुधापासून बनवण्यात आलेल्या केफिरमध्ये असणारे प्रोबायोटिक्स हे तत्व आपली प्रतिकाररकशक्ती दुरुस्त करण्याचे आणि कर्करोगातील ट्यूमर वाढू न देण्याचे काम करतो. ‘जर्नल ऑफ मेडिसिनल फूड’मध्ये प्रकाशित एका अहवालानुसार केफिरच्या सेवनामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका 56 टक्के कमी होतो असे निदर्शनात आल्याचे म्हटले आहे. (केफिर हा दह्यासारखाच पदार्थ असून जो दुधापासून बनवला जातो.)

पनीर खा, तरुण राहा! वाचा काय आहेत फायदे…

डाळिंब –

डाळिंबाला व्हिटॅमिन ए, सी, ई आणि अन्य प्रकारचे मिनरल्सचा प्रमुख स्त्रोत मानले जाते. डाळिंबामध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-ट्यूमर प्रॉपर्टीजही आढळते. ‘नेचर मेडिसिन’मध्ये प्रकाशित एका अहवालामुसार, डाळिंब शरिरातील माइटोकांड्रिका मांसपेशींना कमकुवत पडू देत नाही. तसेच यामुळे ताजेतवाने वाटते आणि रक्ताभिसरणही व्यवस्थित होते.

कच्ची केळी –

आपल्याकडे कच्च्या केळीची भाजी केली जाते. मात्र बऱ्याचदा यात कोणते गुणधर्म असतात हे आपल्याला माहिती नसते. परंतु कच्च्या केळ्यात प्रिबायोटिक तत्व असते यामुळे पोटाचे विकार कमी होण्यास मदत होते. तसेच रक्तदाब नियंत्रणात राखण्यास यामुळे मदत होते. यासह कच्ची केळी खाल्ल्याने किडनीच्या कर्करोगाचा धोका 50 टक्के कमी होत असल्याचे अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

आंबवलेले पदार्थ –

आंबवलेले पदार्थ अर्थात फर्मेटेड फूड. आंबवलेले पदार्थ मेटाबॉलिक रेट बदलू शकता. अर्थात हे पदार्थ पाचनक्रियेची क्षणता वाढवण्याचे काम किंवा दुरुस्त करण्याचे काम करतात. यात असणाऱ्या प्रोबायोटिक्स, अँटीऑक्सिडंट आणि अँटीमाक्रोबियल प्रॉपर्टीज वय आणि दीर्घायुष्यासंबंधी समस्यांचा नाश करतात.

दिवाळीत फराळ, मिठाईवर ताव मारून पोट बिघडलेय, मग ‘हे’ घरगुती उपाय करुन बघा