
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. शनिवारी पहाटे झालेल्या या अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. मृतांपैकी चौघेजण हे एकाच कुटुंबातील आहेत. जतपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. गाणगापूरहून येणाऱ्या स्विफ्ट कारने समोरून येणाऱ्या ट्रकपासून वाचण्यासाठी गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या डंपरला धडक दिली. यामुळे स्विफ्ट कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेले सगळेजण हे जत तालुत्याचे रहिवासी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की मूळचे बनाळी परंतु सध्या जत येथे राहणारे सावंत कुटुंबीय देवदर्शनाला गेले होते. काल रात्री शिफ्ट मोटारीतून विजापूरहून जत कडे येत होते .तेव्हा अमृतवाडी फाट्यावर माती भरलेल्या ट्रकने स्विफ्ट कारला जोराची धडक दिली. या धडकेत स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला. त्यातील चालकासह पाच जण जागीच ठार झाले.त्यामध्ये मयुरी आकाशदीप सावंत (38) श्लोक आकाशदीप सावंत (8) नामदेव सावंत (65) पद्मिनी नामदेव सावंत (60) आणि चालक दत्ता हरिबा चव्हाण(40) हे पाच जण जागीच ठार झाले. या अपघातात शरद आकाशदीप सावंत (13) हा गंभीर जखमी झाला आहे. एकाच कुटुंबातील चौघासह पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे बनाळी व जत शहरावर शोककळा पसरली आहे.
जिल्ह्यात 5 मे रोजी विट्यानजीक मोटार अपघातात तासगांव तालुक्यातील गव्हाण येथील एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले होते.आज सलग दुसऱ्या दिवशी जत तालुक्यात एकाच कुटुंबातील चार जण ठार होण्याची दुर्घटना घडली.
25 एप्रिलला आंदोलनाची पहिली ठिणगी
बारसूत पोलिसी बळाचा वापर करून रिफायनरीसाठी माती परीक्षण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून बारसू आणि परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
25 एप्रिलला बारसूत आंदोलनाची पहिली ठिणगी पडली. हजारो ग्रामस्थांनी प्रकल्पाला विरोध करत आंदोलन सुरू केले. तहानभूक विसरून बारसूच्या माळरानावर भर उन्हात सलग पाच दिवस आंदोलकांनी ठाण मांडले.
हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी 28 एप्रिल रोजी आंदोलकांवर बळाचा वापर केला. आंदोलकांवर अमानुषपणे लाठय़ा चालवण्यात आल्या. त्यात महिलांवरही लाठीमार करण्यात आला. त्यात शेकडो आंदोलक जखमी झाले. त्यानंतर तीन दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आले होते. आज पुन्हा गनिमीकाव्याने आंदोलन सुरू करण्यात आले आहे.


























































