वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! यशस्वी यादव, छेरिंग दोर्जे, के प्रसन्ना, सुहास वारके यांना अपर पोलीस महासंचालकपदी बढती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील पाच विशेष पोलीस महानिरीक्षकांना अपर पोलीस महासंचालकपदी बढती देऊन त्यांच्या नव्या नियुक्तीचा आदेश आज गृहविभागाकडून जारी करण्यात आला.

यशस्वी यादव – अपर पोलीस महासंचालक (सायबर), सुहास वारके- अपर पोलीस महासंचालक (कारागृह व सुधारसेवा), अश्वती दोर्जे- अपर पोलीस महासंचालक (महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग), छेरिंग दोर्जे- अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान), के मल्लिकार्जुन प्रसन्ना – अपर पोलीस महासंचालक (प्रशासन).