
देशातील सर्वात वेगाने वाढणाऱया कार उत्पादकांपैकी एक असलेल्या किआ इंडियाने फिफाला त्यांच्या उत्पादन श्रेणीमधील 68 वाहनांचा पुरवठा केला आहे. ज्यामुळे अंडर-17 महिला विश्वचषक भारत 2022 मध्ये वाहतुकीच्या गरजा पूर्ण केल्या जातील. नुकतेच डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे झालेल्या वाहन हस्तांतर समारंभात किआ कॅरेन्सच्या 30 युनिट्स, किआ कार्निव्हलच्या 20 युनिट्स आणि किआ सेल्टोसच्या 18 युनिट्ससह एकूण 68 वाहने फिफा अधिकाऱयांना सुपूर्द करण्यात आली. या समारंभाला किआ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ताई-जिन पार्क आणि जेम यार्झा, संचालक, फिफा स्पर्धा प्रामुख्याने उपस्थित होते.
किआ ही फिफा अंडर-17 महिला विश्वचषक हिंदुस्थान 2022 साठी अधिकृत ऑटोमोटिव्ह भागीदार आहे. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय फुटबॉल संघ, पंच, सामना अधिकारी, प्रतिनिधी आणि इतर व्हीआयपींना नेण्यासाठी फिफाद्वारे किआच्या सदर वाहनांचा वापर केला जाईल.
























































