बॉक्स ऑफिस दणक्यात, एका महिन्यात चार ब्लॉकब्लस्टर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
four-movie

सामना प्रतिनिधी । मुंबई

मागील एका महिन्यात बॉलिवूडप्रेमींना एक-दोन नव्हे तर तब्बल चार ब्लॉकब्लस्टर चित्रपटांची मेजवानी मिळाली आहे. केदारनाथ, केजीएफ, सिंबा आणि आता ऊरी-द सर्जिकल स्ट्राईक हे चारही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरले आहेत.

केदारनाथ ही एक प्रेमकथा असून 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या महापूरावर आधारित ही कथा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटींच्यावर कमाई केली. रणवीर सिंग आणि सारा अली खान स्टारर सिंबा या रोहित शेट्टीच्या चित्रपटाने तब्बल 230 कोटींचा बिझनेस केला. एका लाचखोर पोलीस अधिकाऱ्याची ही कथा आहे. दक्षिणेकडील अभिनेता यशचा केजीएफ 1 या चित्रपटाने शाहरूखच्या झीरोला चांगलीच धूळ चारली. या चित्रपटाने 150 कोटींचा गल्ला जमवला. 11 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ऊरी या चित्रपटाने पहिल्याच आठवडय़ात 150 कोटींची कमाई केली आहे. विकी कौशल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपट व्यवसायिक तज्ज्ञ तरण आदर्श यांनी या चारही चित्रपटांविषयी ट्विट केले आहे. केदारनाथ, केजीएफ, सिंबा आणि ऊरी… एका महिन्यात चार ब्लॉकब्लस्टर…. (7 डिसेंबर 2018 ते 11 जानेवारी 2019) असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.