‘फ्रान्स’मध्ये चर्चवर दहशतवादी हल्ला; महिलेचा शिरच्छेद करून केली तीन लोकांची हत्या…

फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला झाला असल्याची बातमी समोर येत आहे. फ्रेंच पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण फ्रान्समधील नाइस (Nice) शहरात काही जणांवर चाकूंनी हल्ला करण्यात आला आहे. ज्यात तीन लोकांचा मुत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. हल्लेखोरांनी या महिलेचा शिरच्छेद करून तिची हत्या केली आहे.

नाइसच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. अटकेदरम्यान जखमी झाल्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महापौर ख्रिश्चन अॅस्ट्रोसी यांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला शहराच्या ‘नोट्रे डेम चर्च’च्या जवळपास झाला आहे. तसेच फ्रान्सच्या दहशतवादविरोधी पथकाने सांगितलं की, या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सर्वीकडे चौक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच घटनास्थळी रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या गाड्याही दाखल झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या