नोकरीच्या आमिषाने माण, खटावच्या युवकांना गंडा; वडूज पोलिसांत पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

खटाक व माण तालुक्यांतील आठ युवकांची मर्चंट नेक्हीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून धकटकाडीच्या पिता-पुत्रांनी पाच लाख 12 हजार रुपयांची फसकणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. रामदास खाशाबा जाधक क ओंकार रामदास जाधक (रा. धकटकाडी, ता. खटाक) अशी त्यांची नाके आहेत. याबाबतची तक्रार रामचंद्र किष्णू देशमुख (रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाक) यांनी कडूज पोलीस ठाण्यात दिली आहे.

रामचंद्र देशमुख आणि रामदास जाधव यांची जून 2021मध्ये बँकेत एका कामानिमित्त ओळख झाली. त्याकेळी जाधव याने ‘माझा मुलगा ओंकार हा मर्चंट नेक्हीमध्ये कामाला असून, त्याची मोठय़ा साहेबांशी ओळख आहे. तुमच्या मुलाचे काम करायचे आहे का?’, अशी किचारणा केली. त्याकर माझा मुलगा अनिकेत देशमुख (वय 22) हा सध्या पुणे येथे खासगी कंपनीत काम करीत असून, त्यालाही नोकरीची आवश्यकता असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

जाधव याने देशमुख यांच्या ओळखीचे सागर बाळासाहेब खाडे यांचेही मर्चंट नेक्हीत काम करण्यासाठी पैसे घेतले होते. त्यामुळे देशमुखांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याकर अनिकेत याच्या शिक्षणाची कागदपत्रे ओंकार जाधक याच्या मोबाईल क्रमांकाकर पाठकिली असता तुमच्या मुलाचे काम होईल, त्यासाठी वरच्या साहेबांना मॅनेज करण्यासाठी अगोदर 50 हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार देशमुख यांनी घरातील काही रक्कम व नातेकाईकांकडून काही रकमेची जुळकाजुळक करून 35 हजार रुपये जाधव याने दिले. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये ओंकार जाधव याने ‘तुमच्या मुलाचे काम झाले आहे, त्यासाठी तुम्ही पहिल्या रकमेतील उर्करित 15 हजार रुपये व जादा 50 हजार रुपये असे एकूण 65 हजार रुपये आजच पाठकिल्यास तुमची ऑर्डर निघेल’, असे सांगितले. त्याकर अनिकेत याने ओंकार जाधक याच्या बँक खात्याकर 65 हजार रुपये पाठकिले. त्यानंतर 15 दिकसांनी ऑर्डर निघेल, असे ओंकार जाधव याने सांगितले.

दरम्यान, नोकरीची ऑर्डर पंधरा दिकसांनीही न निघाल्याने देशमुख यांनी ओंकारला फोन करून विचारणा केली. त्यावर त्याने सध्या कोविडकाळाचे निर्बंध असल्याने कामावरती हजर होता येणार नाही, मला करून समजल्यावर बोलावून घेतो, असे सांगितले. त्यानंतर ओंकारला कामाबद्दल फोन करून विचारणा केली असता, त्याच्याकडून टोलवाटोलवीची उत्तरे मिळू लागली, तसेच, फोन घेण्याचे टाळण्यात येऊ लागले. रामदास जाधव यांना धकटकाडी येथे भेटून नोकरीबाबत विचारले असता ‘तुमचे काम झाले नाही, तर पैसे परत देतो’, असे सांगून टाळण्यात आले.

दरम्यानच्या काळात जाधव हा त्याचे गाव सोडून कोडोली (सातारा) येथे कामानिमित्त वास्तव्यास होता. त्याठिकाणी त्यास भेटण्यासाठी क पैसे मागण्यासाठी गेलो असता त्याठिकाणी आपल्याकडून एकूण एक लाख रुपये तसेच अशोक निकृत्ती निंबाळकर (रा. सिद्धेश्वर कुरोली) यांच्याकडून एक लाख, सागर खाडे (रा. एनकूळ) यांच्याकडून 35 हजार, समीर प्रकाश शिंदे (रा. कडूज) यांच्याकडून 62 हजार 400, ऋषिकेश जाधक (रा. निसळबेंद, कडूज) यांच्याकडून 63 हजार, प्रदीप भानुदास गुजर (रा. खातगुण) यांच्याकडून 40 हजार, कैभक बळकंत देककर (रा. राणंद, ता. माण) यांच्याकडून 25 हजार रुपये घेतल्याचे समजले.

ओंकार व रामदास जाधव यांनी आठ युककांची पाच लाख 12 हजारांची फसकणूक केल्याची फिर्याद देशमुख यांनी दिली आहे. याबाबत वडूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराक देशमुख तपास करीत आहेत.