नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासगी विमान कंपनीत नोकरी लावतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या दिनेशकुमार जैस्वाल याला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. त्याने आतापर्यंत तीन जणांची फसवणूक केल्याचे  समोर आले.  तक्रारदार तरुणीची दिनेशसोबत सोशल मीडियावर ओळख झाली होती. दिनेशने तिला एका खासगी विमान कंपनीत नोकरी देतो असे सांगून पैसे घेतले होते. पैसे घेतल्यानंतरदेखील दिनेशने तरुणीला नोकरी दिली नव्हती.