जमीन व्यवहारात फसवणूक केली; नगर शहरातील व्यापाऱ्यांसह बिल्डर, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नगर तालुक्यातील निंबळक या ठिकाणी राहणारे सिंधूताई निकम व त्यांच्या कुटुंबाची फसवणूक केल्याप्रकरणी नगर शहरातील व्यापारी, बिल्डर आणि अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकम यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत त्यांच्या कोऱ्या कागदांवर, स्टॅम्प पेपरवर आणि इतर दस्तांवर आंगठे घेण्यात आले. त्यानंतर तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून सदर मिळकतीचे इतर हक्कात असलेल्या आदिवासी मिळकत हस्तांतरणास बंदी असा शेरा हटवून सदर मिळकत स्वतःच्या नावे करुन घेतली. याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नगर मधील व्यापारी, बिल्डर व शासनातील अधिकारी यांच्यावर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश भगवानदास छाबरीया (वय 47, धंदा शेती व व्यापार, रा. सावेडी), सरला भगानदास छाबरीया (वय 77, धंदा शेती, रा. सावेडी) शिवाजीराव आनंदराव फाळके (वय 65, धंदा शेती व व्यापार, रा. कारेगाव, ता. कर्जत, जि. नगर), आशिष रमेश पोखरणा (वय 40 , धंदा शेती व व्यापार, रा. सर्जेपुरा, नगर), जयवंत शिवाजीराव फाळके (वय 39, धंदा शेती व व्यापार, रा. कर्जत गावठाण, ता. कर्जत), आकाश राजकुमार गुरनानी (वय 29, धंदा व्यापार, रा. सावेडी, नगर), माणिक आनंदराव पलांडे (वय 55, धंदा व्यवसाय, रा. पिंपळे रोड, पुणे), अजय रमेश पोखरणा (वय 45, धंदा शेती व व्यापार, रा. सर्जेपुरा, नगर), गौतम विजय बोरा (वय 48, धंदा व्यवसाय, रा. कापडबाजार, नगर), नरेंद्र शांतिकुमार फिरोदिया (वय 45, धंदा व्यापार, रा. नगर संभाजीनगर रोड, नगर), कामगार तलाठी- हरिश्चंद्र विजय देशपांडे (वय 47, धंदा नोकरी, रा. निंबळक, ता. जि. नगर), मंडल अधिकारी – दिलीप श्रीधर जायभाय, (वय 50, धंदा मजुरी, रा. नागापूर, ता.जि. नगर), सहाय्यक दुय्यम निबंधक, वर्ग 2, आणि 1 यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

सिंधुताई निकम व मुलगा भाऊसाहेब मुरलीधर निकम, त्यांची पत्नी सिमा भाऊसाहेब निकम, दोन नातवंडासह एकत्र राहत असून वडिलोपार्जीत शेतजमीन कसून त्यावर उदरनिर्वाह करत आहेत. दि. २९ ऑक्टोबर २०१० रोजी दस्त क्र. ५९५० अन्वये, दि. ०६ मार्च २०१२ रोजी दस्त क्र. १२६८/२०१२ अन्वये, दि. १२ मे २०१४ रोजी दस्त क्र. २८४०/१४ अन्वये, दि. २९ मे २०१४ दस्त क्र. १७१४५ वा० २८४१/२०१४ व दस्त क्र. २८४२/२०१४ अन्वये सदर मिळकतीचे मालकी हक्क सदरी सुर्यभान सिताराम जाधव, लिलाबाई कुंडलीक गायकवाड, इंदूबाई रंगनाथ शिंदे, सिंधूबाई मुरलीधर निकम, साखरबाई बळिराम मोरे, सरुवाई चिमाजी बड़े व रंगुबाई खंडू निकम इत्यादी इसमांची हे ६७ आर व पोट खराबा १ हे ४ आर अशी एकूण १ हे ७१ आर या मिळकतीस नोंद आहे. पैकी गट नं. ४०/३/२ चे क्षेत्र ५ हे ९८ आर ही निरीक्षक मिळकत आरोपी शिवाजी आनंदाराव फाळके व दिनेश भगवान छाबरीया यांनी तसेच गट नं. ४०/१/२ चे स्टेशन्क्षेत्र २ हे ८५ आर या मिळकती आरोपी जयंवत फाळके व दिनेश छाबरीया यांनी तसेच गट नं. ४०/२/२ चे क्षेत्र ३ हे ९६ आर ही मिळकत आरोपी माणिक आनंदराव पलांडे व दिनश भगवान छाबरीया व जयवंत शिवाजीराव फाळके यांनी फिर्यादी व त्यांचे कुटुंबीयांची फसवणूक करुन त्यांच्या कोऱ्या कागदांवर व स्टॅम्पवर व इतर दस्तांवर सहया आंगठे घेऊन तसेच तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून सदर मिळकतीचे इतर हक्कात असलेल्या आदिवाशी मिळकत हस्तांतरणास बंदी असा शेरा हटवून सदर मिळकतीचे बेकायदेशीर व पोकळीस्त खरेदी खते स्वतःचे नावे करुन घेतली.

सदर मिळकती आरोपी अजय रमेश पोखरणा, गौतम विजय बोरा, नरेंद्र शांतिकुमार फियोदीया व इतर आरोपी यांचे नावे खरेदी खत दि. २2 जून २०२३ रोजी दस्त क्र. ४०४७/२०२३, ४०४८/२०२३ व ४०४९/२०२३ अन्वये बेकायदेशीर पणे नोंदल्याचे फिर्यादीस नुकतेच समजले आहे. या ठिकाणी माझे व माझे कुटुंबीयांच्या राहत्या झोपडया असून त्यामध्ये माझा व माझे कुटुंबीयांचा संसार सुरु आहे. परंतू यातील आरोपी यांनी कट कारस्थान रचुन मला व माझे कुटुंबाला भुमीहीन करुन बेकायदेशीर पणे आमचे जमीनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न केला म्हणून वरील आरोपींच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीसह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.