Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘4 मार्च’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Saturday, March 4, 2023)
शत्रूंपासून सावध राहा. नेहमीची कामे करताना अडचणी येण्याची शक्यता आहे. शेजाऱ्यांकडून मदत मिळेल. समाजात कौतुक होईल. घराच्या सुशोभिकरणासाठी वेळ द्याल. नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळेल. नवीन माहिती कानावर येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : गुलाबी

वृषभ (TAURUS – Saturday, March 4, 2023)
आजचा दिवस व्यस्ततेत जाण्याची शक्यता आहे, मात्र कोणाकडून ना कोणाकडून तरी मदत मिळेल. जवळचे नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. शारीरिक कष्टाची कामे करू नका. सकारात्मक विचार करा. अति बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. नव्या कला आत्मसात करण्यासाठी वेळ द्या.
शुभरंग : लाल

मिथुन (GEMINI – Saturday, March 4, 2023)
मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ द्याल. मनातील अतिरिक्त विचार कमी होण्यासाठी उपासना करा. स्वत:साठी वेळ काढाल. जवळच्या मैत्रिणीची अनपेक्षित भेट होईल. नोकरीत नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. स्वत:विषयी सकारात्मक विचार करा. सकाळी लवकर उठा.
शुभरंग : जांभळा

कर्क (CANCER – Saturday, March 4, 2023)
भावनांवर नियंत्रण ठेवा. अप्रिय घटनांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात भाग घ्याल. मनमोकळ्या गप्पा माराल. फुलझाडांच्या कुंडीत गावठी गुलाबाचे झाड लावा. सायंकाळी कामावरून सुटल्यावर घरी जाताना पत्नीसाठी मोगऱ्याचा गजरा घेऊन घरी जाल. घरातील वातावरण आनंददायी असेल. संपर्कात येणाऱ्या व्यक्तिंना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
शुभरंग : निळा

सिंह (LEO – Saturday, March 4, 2023)
आज आपल्याकरिता एक नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. इच्छा आणि गरजा वाढतील. सुखद घटना घडेल. बेजबाबदारपणे वागणे टाळा. अनावश्यक खर्च टाळा. मित्र किंवा नातेवाईकांसोबत थोडेसे गैरसमज होण्याची शक्यता आहे. समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. प्रिय व्यक्तिची भेट होईल. नको त्या ठिकाणी कंजूसपणा करू नका.
शुभरंग : आकाशी

कन्या (VIRGO -Saturday, March 4, 2023)
आरोग्याची काळजी घ्या. स्वत:साठी वेळ काढा. उधारी वसूल कराल. आजच्या अनुभवातून बरेच काही शिकायला मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नाती जपाल. घराजवळील परिसरात असलेल्या झाडांची निगा राखा. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. आवडती कामे करण्यासाठी वेळ काढाल. समाजात लोकं स्तुती करतील. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : मोरपिसी

तूळ (LIBRA- Saturday, March 4, 2023)
आजचा दिवस उत्तम आहे. जबाबदाऱ्या सहज पूर्ण कराल. इच्छा पूर्ण होतील. सकारात्मक मानसिकता ठेवा. नोकरी-व्यवसायात प्रगती करण्याच्या संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. घरातील अनावश्यक सामान जमवून ठेवू नका. ज्येष्ठ व्यक्तिंचा सल्ला घ्यावा लागेल. ब्यूटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल. आईवडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभरंग : राखाडी

वृश्चिक ( SCORPIO – Saturday, March 4, 2023)
आध्यात्मिक कार्यात भाग घ्याल. सगळ्यांसोबत चांगला व्यवहार करा. मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्याकरिता इष्टदेवतेची आराधना करा. प्रिय व्यक्तिंच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सौंदर्यवाढीसाठी वेळ द्याल. रोज सकाळी तुळशीची पूजा करा. बोलताना मधुरावाणीचा उपयोग करा. परिस्थिती अनुकूल असेल.
शुभरंग : किरमिजी

धनु (SAGITTARIUS – Saturday, March 4, 2023)
सकाळी मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. घरात आनंददायी वातावरण असेल. नकारात्मक विचार मनात आणू नका. एखाद्या जुन्या चिंतेमुळे मनाला त्रास होण्याची शक्यता आहे. वादविवाद करण्याच्या फंद्यात पडू नका. मनाला शांतता मिळेल. आवडता पोषाख परिधान करा. प्रवासात नवीन ओळख होईल.
शुभरंग : सोनेरी

मकर ( CAPRICORN – Saturday, March 4, 2023)
घरातील वातावरण सुखी, समाधानी आणि आनंददायी असेल. समाजात मानसम्मान मिळेल. दुपारनंतर मित्रपरिवाराच्या भेटीगाठीत वेळ घालवाल. वाहन सुख मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मन प्रफुल्लित राहिल. कपाळावर कुंकवाचा टिळा लावा. घरात सुगंधी अत्तर शिंपडा.
शुभरंग : पांढरा

कुंभ (AQUARIUS – Saturday, March 4, 2023)
कलेतील बारकावे शिकून घ्याल. अनावश्यक खर्च टाळा. दुपारच्या वेळी घरातील वातावरण शांततापूर्ण असेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. आर्थिक लाभ होईल. अतिबोलण्यावर ताबा ठेवा. व्यापारात मित्रमैत्रिणींची मदत मिळेल. नको त्या विषयावर बोलणे टाळा. प्रवासाचे बेत आखाल.
शुभरंग : चंदेरी

मीन (PISCES – Saturday, March 4, 2023)
नको तिकडे भावनाशील होऊ नका. पोटाची काळजी घ्या. प्रवासाकरिता सध्याची वेळ अनुकूल आहे. आवडता पदार्थ खायला मिळाला तरी आहाराची पथ्ये सांभाळावी लागतील. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. अन्नदान करा. घराबाहेर जाताना घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्याल.
शुभरंग : गुलाबी