हिंदुस्थानच्या गुकेशचा जगज्जेत्या कार्लसनवर सनसनाटी विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या के. डी. गुकेशने जगज्जेत्या नार्वेच्या मॅग्नस कार्लसनवर सनसनाटी विजय मिळवित फ्रिस्टाईल चेस चॅलेंज सुपर स्पर्धेतील रविवारचा दिवस गाजविला. 960 चेस फॉरमॅटमधील या स्पर्धेत जगातील आघाडीच्या आठ खेळाडूंचा समावेश आहे. पहिल्या तीन फेऱयांमध्ये गुकेशने दोन विजयांसह एक पराभव पत्करला आहे. गुकेशला पहिल्या फेरीत फ्रान्सच्या अलीरेजा फिरौझाकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, त्याने दुसऱया फेरीत अव्वल मानांकित व पाच वेळच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर गुकेशने तिसऱया फेरीत अमेरिकेच्या माजी विश्वचषक विजेत्या लेवान एरोनियनचा पराभव करून पुन्हा एकदा आपल्या क्षमतेची झलक दाखविली. तीन फेऱयांनंतर यजमान जर्मनीचा विन्सेंट केमर 2.5 गुणांसह आघाडीवर असून, हिंदुस्थानच्या गुकेशसह यूएसएचा फबियानो करुआना, उझबेकिस्तानचा अब्दुसत्तोरोव नोदिरबेक व फ्रान्सचा अलीरेजा फिरौझा प्रत्येकी 2 गुणांसह संयुक्तपणे दुसऱया स्थानावर आहे.