पाण्याअभावी फळबागा जळून खाक, शेतकर्‍यांची नुकसान भरपाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

पाथर्डीसह तालुक्यातील तिसगांव, मेरी, जोडमोहज, चिचोंडी, कोल्हार, मढी, शिरापूर आदीसह विविध भागाम मोठ्या प्रमाणात असणार्‍या संत्री, मोसंबी व डाळिंबाच्या फळबागा पाण्याअभावी जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

यंदाचा दुष्काळ पाहता अत्यंत गंभीर असून यामधून अनेकांना आपल्या शेतीमधील मालाला धोका निर्माण झाला आहे. विहिरी, पाझरतलाव, नद्या अटत चालल्या आहेत. विविध ठिकाणी पाण्याचे संकट आ वासून उभे आहे. फळबागांना पाणी देण्यासाठी उरले नाही. पिण्याच्या पाण्याची गभीर अवस्था निर्माण झाली आहे. पैसे देऊनही फळबागांसाठभ पाणी मिळत नाही. उभे पीक हाताशी आले असताना दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतली असल्याने पाणी नाही आणि टँकरही मिळत नसल्याने सरकार काय तारणार नाही अशीच अपेक्षा शेतकर्‍यांची झाली आहे. उभे पिक जळून जात असल्याने शेतकरी आता हवालदिल झाला असून कोण तारण हार होणार याकडे त्याचे  लक्ष लागले आहे.

जिल्हयात विविध ठिकाणी शेवगांव, पाथर्डी, नेवासा, कर्जत आदी ठिकाणी दुष्काळाने शेतकरी पुर्णपणे पिचला गेला आहे. तर डाळींब, मोसंबी आणि संत्रीची एवढ्या दिवस पालन पोषण करुन हाती मात्र यंदा काहीच येणार नसल्याने आता दाद मागायची कुणाकडे आणि न्याय देणार कोण अशीच प्रतिक्रिया शेतकर्‍यांनीव्यक्त केली आहे.