लग्न समारंभात गर्दी झाल्यास तलाठी आणि ग्रामसेवकांवर कारवाई करणार

एप्रिलमधील ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता जिल्ह्यात कोरोना संसर्ग अधिक गतीने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच जिल्ह्यात 185 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी, लग्नसमारंभासाठी निश्चित संख्येपेक्षा अधिक लोक आढळल्यास वधुवरांच्या कुटुंबियांबरोबरच संबंधित गावचे तलाठी व ग्रामसेवकांवरही कारवाई होणार असल्याचे महत्त्वाचे आदेश काढले आहेत. तसेच स्थानिक प्रशासनाला विविध ग्रामीण कार्यक्रमातील गर्दी कमी करणेबाबत व नियमानुसार कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याबाबत या अगोदरच सूचना करण्यात आले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात आज 11 जणांचा मृत्यू झाला तर 434 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या 434 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 165, अहेरी 68, आरमोरी 33, भामरागड 14, चामोर्शी 20, धानोरा 21, एटापल्ली 17, कोरची 12, कुरखेडा 17, मुलचेरा 4, सिरोंचा 9 तर वडसा तालुक्यात 42 जणांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या