विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी कोकणात जाताना चाकरमान्यांचा जीवघेणा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अनेकजण आपल्या आराध्य बाप्पांच्या आगमनासाठी जय्यत तयारी करत आहेत. कोकणात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. अनेक चाकरमानी मुंबईतून कोकणात निघाले आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वे, बस फुल्ल आहेत. कोकणात जाणाऱ्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.

यंदा गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होऊ नये, म्हणून रेल्वेने अनेक जादा गाड्यांची सोय केली. एसटीनेही या मार्गावर अनेक जादा फेऱ्या सोडल्या आहेत. तरीही कोकणात जाताना चाकरमान्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दिवा स्थानकात दिवा-सावंतवाडी पॅसेंजर पकडण्यासाठी तुफान गर्दी झाली आहे. गाडी पकडण्यासाठी अनेकजण रेल्वे ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला उभे होते. कोकणाच विघ्नहर्त्यांच्या स्वागतासाठी जाताना चाकरमान्यांना जीव मुठीत घेत प्रवास करावा लागत आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणाकडे जाण्यासाठी निघाल्याने मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी स्थानकात प्रचंड गर्दी झाली आहे. गणेशोत्सावात कोकणात जाण्यासाठी काही महिने आधीच आरक्षण फुल्ल होते. त्यामुळे ऐनवेळी कोकणात जाणाच्या बेत केलेल्यांची अडचण होते. तरीही मिळेल त्या गाडीने कोकण गाठण्याची अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी दिवा स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली आहे. या गर्दीचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचे दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मुंबई- गोवा महामार्गाची चाळण झाल्याने रस्ते मार्गाने कोकणात जाणाऱ्यांना खड्डे चुकवत तारवेरची कसरत करत कोकण गाठावे लागत आहे. तसेच कोकणात जाणाऱ्या रेल्वे आणि बसेस आणि टॅव्हल्स फुल्ल झाल्याने अनेकजण रस्ते मार्गाने कोकणात निघाल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. असे असूनही गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी चाकरमानी बाहरे पडले आहेत. त्यामुळे रेल्वे, बसेस, खाजगी वाहने फुल्ल आहेत. त्यामुळे अनेकजण खासगी वाहनाने गावाला निघाले आहेत. मात्र, या मार्गावरही खड्ड्याचे आणि वाहतूक कोंडीचे विघ्न आहे.