समन्वय समिती शनिवारी भूमिका जाहीर करणार; नियमावलीचा पुनर्विचार करण्याची मंडळांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी गणोशोत्सवासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाच्या नियमावलीवरून मुंबईतील जवळपास सर्वच गणेशोत्सव मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, याबाबत ठोस भूमिका ठरविण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून येत्या शनिवारी बैठक आयोजित केली असून या बैठकीनंतर आगामी भूमिका जाहीर करणार आहेत. तर दुसरीकडे अनेक नामांकित मंडळांनी आणि मूर्तिकारांनी या नियमावलीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी लावून धरली आहे.

याबद्दल बोलताना बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर म्हणाले की, यासंदर्भात राज्य सरकारकडे समन्वय समिती असो किंवा सार्वजनिक मंडळांनी पत्रव्यवहार करून आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र त्यानंतरही मंडळांची कोणतीही बाजू ऐकून न घेता गृह विभागाने परस्पर ही नियमावली जाहीर करणे हे अन्यायकारक आहे. मंडळांना एक संधी देणे महत्त्वाचे होते. त्यांच्या मागण्या ऐकून घ्यायल्या हव्या होत्या. यासर्व प्रकरणी आम्ही आमची भूमिका ठरविण्यासाठी शनिवारी बैठक आयोजित केली असून त्यानंतरच आगामी भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी यावेळी दै. ‘सामना’शी बोलताना स्पष्ट केले.