मध्य रेल्वेच्या आणखी 63 गणपती स्पेशल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा कोकणात गणपती सणासाठी जाणाऱया भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने आणखी 63 ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने सुरुवातीला 72 नंतर 40 अशा 112 विशेष फेऱया तर पश्चिम रेल्वेने वसईमार्गे 38 फेऱया अशा एकूण 150 फेऱया चालविण्याचा निर्णय घेतला होता. मध्य रेल्वेच्या नव्या 63 फेऱयांमुळे यंदाच्या एकूण गणपती स्पेशल फेऱयांची संख्या आता 213 इतकी झाली आहे. आता मध्य रेल्वेने आणखी 63 फेऱया सोडण्याचा निर्णय आज जाहीर केला असून त्या एलटीटी ते रत्नागिरी-सावंतवाडी, पनवेल ते सावंतवाडी-चिपळूण, दादर ते रत्नागिरी -मंगळुरू जंक्शन आणि नागपूर ते करमाळी अशा चालविण्यात येणार आहेत.