हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

GANGRAPE IN BIHAR

आईसोबत झालेल्या किरकोळ भांडणामुळे घरातून बाहेर पडलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर चारजणांनी सामूहिक बलात्कार केला. मागील दोन दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पीडित मुलीने नराधमांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी मराठवाडय़ातील एका खेडय़ातील आहे. लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी तिचे पुटुंबीय पुणे शहरात आले होते. तिचे आई-वडील मोलमजुरी करतात. 26 ऑक्टोबरला मुलीचा आईसोबत वाद झाला. त्या रागातून तिने घर सोडले होते. त्यावेळी चौघांनी तिचे अपहरण केले.

त्यानंतर सलग दोन दिवस अल्पवयीन मुलीवर त्यांनी बलात्कार केला. सुदैवाने पीडित मुलगी काल मध्यरात्री नराधमांच्या तावडीतून सुटली. त्यानंतर आज पहाटे मुलीने एका व्यक्तीची मदत घेत घडलेला प्रकार सांगितला. संबंधित व्यक्तीने मुलीला थेट हडपसर पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ दोन संशयितांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या