गौतम अदानींनी श्रीमंतीत अंबानींना मागे टाकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी श्रीमंतीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींना मागे टाकले आहे. अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून जगातील आघाडीच्या दहा धनाढय़ उद्योजकांच्या यादीत त्यांनी स्थान पटकावले आहे. फोर्ब्सच्या रिअल टाइम यादीनुसार, गौतम अदानी व त्यांचे कुटुंब सध्या 90 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील दहा धनाढय़ांच्या पंक्तीत बसले आहे. दीर्घकाळ हिंदुस्थान आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींच्या संपत्तीत मागील 1 दिवसात 2.2 अब्ज डॉलरची घट झाली. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती 89 अब्ज डॉलरवर घसरली.