दक्षिण कोरियाचा सनसनाटी विजय, विश्वविजेती जर्मनी विश्वचषकातून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मॉस्को

फिफा विश्वचषकामध्ये बुधवारी मोठा उलटफेर झाला. माजी विश्वविजेती जर्मनीला दक्षिण कोरियाकडून धक्कादायक पराभव सहन करावा लागला. या पराभवामुळे जगज्जेत्या जर्मनीवर साखळी फेरीमधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली आहे. दक्षिण कोरियाने अखेरच्या चार मिनिटांमध्ये दोन गोल करत विश्वविजेत्यांना घरचा रस्ता दाखवला. कोरियाच्या संघाचे आव्हान आधीच संपुष्टात आले होते, परंतु जाता जाता त्यांना फुटबॉल प्रेमींना मोठा धक्का दिला.

स्वीडनचा विजय
दुसरीकडे बुधवारी सायंकाळी झालेल्या अन्य एका सामन्यात स्वीडनने मेक्सिकोवर ३-० असा पराभव करत अंतिम १६ मध्ये स्थान मिळवले. या पराभवामुळे मेक्सिकोचे काही नुकसान झाले नसून ग्रुप एफमध्ये दोन विजय आणि एका पराभवासह मेक्सिकन संघ पहिल्या स्थानावर कायम आहे.