जळगाव घरकुल घोटाळय़ातील दोघांना जामीन

185

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघा विकासकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. 5 लाखांच्या जात मुचलक्यावर आरोपी राजेंद्र मयूर आणि जगन्नाथ वाणी या दोघांचा जामीन अर्ज न्यायमूर्ती रणजीत मोरे यांच्या खंडपीठाने मंजूर केला.  1990 साली जळगावात झालेल्या 29 कोटींच्या घरकुल योजना घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन तसेच राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह 48 जणांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली. तसेच अटक करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये आरोपी राजेंद्र मयूर आणि जगन्नाथ वाणी या दोघांचा समावेश होता. सत्र न्यायालयाने या आरोपींना सात वर्षांची कैद आणि 40 कोटींचा दंड ठोठावला होता. या आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या