
दादर रेल्वे पादचारी पुलावरून जाणार्या युवतीचा विनयभंग करणार्याला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली. रणजित यादव असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
पीडित युवती ही सोमवारी कॉलेजला गेली होती. दुपारी ती दादरच्या फलाट क्रमांक 6 येथे उतरली. ती पादचारी पुलावरून जात असताना रणजितने तिला नकोसा स्पर्श केला. युवतीने आरडाओरड केल्यावर फलाटावरील प्रवाशांनी यादवला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. युवतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी यादव विरोधात ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.

























































