
मॉडेल उर्फी जावेदवर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे तिला संरक्षण देण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
उर्फी व भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यात सध्या वाद पेटला आहे. त्यावरून उर्फीने राज्य महिला आयोगाकडे चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल करत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. या पत्राच्या आधारावर राज्य महिला आयोगाने पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. चित्रा वाघ या राजकीय व्यक्तिमत्त्व असल्याने त्या किंवा त्यांचा प्रभाव असलेल्या व्यक्तीकडून उर्फीवर हल्ला होऊ शकतो. म्हणूनच सुरक्षा पुरवण्याची मागणी उर्फीने केल्याचे रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.


























































