महाराष्ट्रातली गोदावरी जगभर पसरेल,उध्दव ठाकरे यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray-interview

सामना प्रतिनिधी । मुंबई 

महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राबद्दल कमालीची नाराजी आहे. त्या नाराज झालेल्या लोकांमध्ये पुन्हा विश्वास जागृत करण्याचे काम गोदावरीने केलेले आहे. गावपातळीवर गोदावरीच्या माध्यमातून झालेले काम उल्लेखनीय आहे. आता तसेच काम मुंबई सारख्या मेट्रोसिटी  मध्ये होणार आहे. गोदावरी अर्बनच्या संस्कृतीचा मुबंईकर स्वीकार कारतील तसेच महाराष्ट्रातील गोदावरी लवकरच जगभर पसरेल असे भावपूर्ण उदगार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकाराला सत्याची जोड देण्याचे अनेक प्रयोग गोदावरीने केले. महाराष्ट्राप्रमाणेच  मुबंईकरही गोदावरी ला भरभरून प्रतिसाद देतील असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी लि. नांदेड यांच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते मुबंईत पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती याप्रसंगी राज्याचे मंत्री गिरीष महाजन, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, संजय राठोड, विजय शिवतारे, दादाजी भुसे, संस्थापक हेमंत पाटील, राजश्री पाटील, धनंजय तांबेकर सर्व संचालकांची उपस्थिती होती.

उद्धव ठाकरे यांनी गोदावरी अर्बनने केलेल्या वेगवेगळ्या कामाचे दाखले देत या बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्याना न्याय कसा मिळतो याचे स्पष्टीकरणही दिले. हेमंत पाटील आणि राजश्री पाटील या दोघांनी बाळासाहेब यांचे सर्वसामान्याला काम देण्याचे स्वप्न पूर्ण केल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले.

नांदेडहुन सुरवात झालेल्या छोटासा वटवृक्ष मुबंईच्या वैभवात भर घालणारा आहे. लोकहित आणि पारदर्शकता असल्यामुळे नांदेडची गोदावरी पाच राज्याचा प्रवास करीत मुंबईच्या समुद्रापर्यंत आली आहे. सहकारामध्ये आणि सहकार्यमध्ये अव्वल स्थान असणाऱ्या मुबंईकारना माझं आव्हान आहे की, त्यांनी गोदावरी अर्बनच्या सहकारी चळवळीला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवावा. मुंबई सारख्या कॉर्पोरेट क्षेत्राला सहकाराच्या चळवळीमधून बळकटीकरण येण्याची आज खरी गरज आहे.ती गरज पूर्ण करण्यासाठी गोदावरीने उचलेले पाऊल महत्त्वपुर्ण आहे. मी गोदावरीच्या उद्घाटनाच्या अनेक कार्यक्रमाला अनेक वेळा गेलो तिथे मी आवर्जून लोकांना सांगितल ही बँक माझी ,आपली, सर्वांमन्याची आहे. आता मुबंईकरसुद्धा या बँकेच्या माध्यमातून आपल्या उद्योगसाठी उपक्रमासाठी आधार वड मिळेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

सहकार क्षेत्रात राज्यात पहिल्या टॉपमध्ये गोदावरीचा नंबर असेल ही पतसंस्था जनसामन्याचा आवाज असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.  या कार्यक्रमास मुबंई मधून अनेक व्यापारी, ठेवीदार हितचिंतक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.