Gold price – खुशखबर! दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदीच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या 1 तोळ्याचा भाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोने खरेदीदारांसाठी खुशखबर असून सोने-चांदीच्या किंमतीत शुक्रवारी घसरण झाली. सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅममागे 327 एवढा कमी झाला, तर चांदीची किंमतही प्रति किलोमागे 128 रुपये कमी झाली.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोने 56 हजारांवर गेले. दिवाळीत सोन्याचा दर आणखी वाढण्याचा अंदाज होता. मात्र गेल्या 3 महिन्यात सोने 5 हजारांनी खाली आले आहे. त्यामुळे सराफा दुकानात देखील गर्दी पाहायला मिळत आहे.

gold4

शुक्रवारी सोने 327 रुपयांनी घसरले आणि 10 ग्रॅमचा भाव (1 तोळा) 51 हजार 728 रुपयांवर स्थिरावला. तर चांदीची 1 किलोची किंमत 64 हजार 895 रुपये इतकी झाली आहे.

gold

आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोने-चांदीचा दर घसरला. सोने प्रति औस 6 डॉलरने कमी झाले आणि याची किंमत 1 हजार 940.80 डॉलरवर स्थिरावली. तर चांदी देखील 0.06 डॉलरची घसरण होऊन प्रति औस 25.26 डॉलरवर स्थिरावली.