सोन्याच्या दराने गाठला उच्चांक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोन्याच्या दराने बुधवारी सलग दुसऱया दिवशी सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, 10 ग्रॅम सोने 862 रुपयांनी महागले आणि 62,775 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलो 75 हजार 700 रुपयांवर पोहोचला आहे. याआधी मंगळवारी सोन्याचे दर 61 हजार 913 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढे होते. शेअर बाजारात सुरू असलेल्या चढ-उतारांमुळे पुढील एका वर्षात हे सोने 67 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.