
सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सध्या बाजारात सोन्याचे भाव 54 हजारांवर पोहोचले आहेत. सोन्याची ही होणारी भाववाढ आता थांबणार नसून येत्या नवीन वर्षात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची आहे. येत्या 2023 मध्ये सोन्याचे दर 64 हजार रुपये प्रति तोळा पर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
सध्या लग्नाचा हंगाम सुरू असल्याने सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे लोकांचा सोने खरेदीकडे कल वाढतोय. जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढल्या की सोन्याच्या किमती वाढतात. काही कंपन्या कच्चे तेल खरेदी करतात आणि मोबदल्यात सोने देतात. यामुळे सोन्याच्या भावात वाढ होते.
आता सोहळे आणि उत्सव यामुळे सोन्याची मागणी जास्त आहे.






















































