सोने-चांदीच्या आयात शुल्कात वाढ

सोने व चांदीची नाणी आणि दागिन्यांचे सुटे भाग यांच्या आयात शुल्कात सरकारने मंगळवारी वाढ केली. त्यामुळे हे आयात शुल्क आता दहा टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर पोहोचले आहे. आयात शुल्क वाढीमुळे आगामी काळात सोने, चांदीचे दागिने महाग होतील असा जाणकारांचा अंदाज आहे. मात्र यामुळे दरात फारशी वाढ होणार नाही.

आयात शुल्क 15 टक्के वाढ करण्यामध्ये आधारभूत सीमा शुल्क दहा टक्के आणि कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर पाच टक्के वाढ यांचा समावेश आहे. 2023 मध्ये एकूण 734 टन सोने आयात करण्यात आले. गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये देशातील सोन्याची आयात तीन टक्क्यांनी वाढून 734.2 टन झाली.

ऑक्टोबर 2023 पर्यंत 1,241 टन आयात करून चीन सोन्याचा सर्वात मोठा आयातदार आहे. सोने आणि चांदीवरील आयात शुल्काचे नवीन दर 22 जानेवारी 2024 पासून लागू झाले आहेत.

– देशात दरवर्षी 700 ते 800 टन सोन्याला मागणी होते. यापैकी केवळ एक टन उत्पादन हिंदुस्थानात होते आणि उर्वरित आयात केले जाते.