राज्यात बूस्टर डोसला चांगला प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
BOOSTER-DOSE

राज्यात 15 जुलैपासून सुरू झालेल्या 18 ते 59 वयोगटासाठी सुरू झालेल्या मोफत बूस्टर डोसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 15 जुलैला पहिल्याच दिवशी राज्यभरात सुमारे 85 हजार जणांनी बूस्टर डोस घेतला. कोरोना नियंत्रणात आल्यामुळे राज्यात लसीकरणाचे प्रमाण कमी झाले आहे; परंतु 15 जुलैपासून 18 ते 59 वयोगटातील व्यक्तींसाठी मोफत लसीकरण सुरू झाल्याने पुन्हा लसीकरणाचा प्रतिसाद वाढला आहे.

राज्यभरात शुक्रवारी सुमारे दीड लाख जणांचे लसीकरण झाले. यामध्ये सुमारे 85 जणांनी बूस्टर डोस घेतला. बूस्टर डोस खासगी रुग्णालयांमध्येच सशुल्क सुरू होते. त्यामुळे हे लसीकरण खासगी रुग्णालयांपुरतेच मर्यादित राहिल्याने मुंबई, पुणे या शहरांमध्येच मोठय़ा प्रमाणात होत होते. 15 जुलैपासून महापालिका आणि सरकारी केंद्रावर मोफत लसीकरण सुरू केल्यामुळे एका दिवसातच 84 हजार 948 जणांनी बूस्टर डोस घेतला. मुंबई, ठाणे या जिह्यांमध्ये बूस्टर डोस घेणाऱयांची संख्या मोठी आहे. दरम्यान, हिंदुस्थानने लसीकरणात 200 कोटी डोस देण्याचे उद्दिष्ट रविवारी पूर्ण केले.