कंपनी सोडून गेलेल्या एका माजी कर्मचाऱ्यासाठी गुगलने तब्बल 22625 कोटी रुपये मोजले आहेत. नोआम शजीर असे या माजी कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने गुगलमध्ये 21 वर्षे काम केले होते. परंतु काही कारणास्तव 2021 मध्ये गुगल कंपनी सोडली होती.
गुगल सोडल्यानंतर त्याने कॅरेक्टर डॉट एआय नावाचे एक स्टार्टअप सुरू केले. आज हे जगातील सर्वात प्रभावशाली एआय स्टार्टअप पैकी एक आहे. गुगलला टेक्नोलॉजीसाठी पुन्हा एकदा नोआमची आठवण आली.