प्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर नाही?, आत्ताच करा डिलीट

गूगल सातत्याने आपल्या प्ले स्टोअरमधून युजर्सच्या सुरक्षेला धोकादायक ठरणारे ऍप हटवत असतो. आताही या दिग्गज कंपनीने 17 खतरनाक ऍप गुगल प्ले स्टोअरमधून डिलीट केले आहे. हे ऍप युजर्सची माहिती चोरण्याचे काम करत होते.Zscaler ThrearLabZ च्या संशोधनात या मालवेअरचा शोध लागला आहे.

याबाबत माहिती देताना सांगण्यात आले जी, या 17 ऍपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा खतरनाक मालवेअर आढळला आहे. हे ऍप जवळपास 1 लाख 20 हजारांहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहेत. यातील बहुतांश ऍप स्कॅनर ऍप असून काही फोटो आणि व्हिडीओ एडिटर ऍप आहेत. हे ऍप युजर्सचे मेसेज, कॉन्टॅक्ट लिस्ट आणि फोनमधील अन्य खासगी माहिती चोरी करण्याच्या उद्देशाने बनवण्यात आले आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये पुढील ऍप असतील तर तात्काळ डिलीट करा.

1. All Good PDF Scanner
2. Mint Leaf Message-Your Private Message
3. Unique Keyboard – Fancy Fonts & Free Emoticons
4. Tangram App Lock
5. Direct Messenger
6. Private SMS
7. One Sentence Translator – Multifunctional Translator
8. Style Photo Collage
9. Meticulous Scanner
10. Desire Translate
11. Talent Photo Editor – Blur focus
12. Care Message
13. Part Message
14. Paper Doc Scanner
15. Blue Scanner
16. Hummingbird PDF Converter – Photo to PDF
17. All Good PDF Scanner

आपली प्रतिक्रिया द्या