चोर-उचक्के, लोफर माझ्या पाठीशी आहेत म्हणूनच मी निवडणूक जिंकतो!

सामना ऑनलाईन, भाईंदर

चोर-उचक्के, लोफर माझ्या पाठीशी आहेत. अशी ९० टक्के माणसे माझ्यासोबत असतात म्हणूनच मी निवडणूक जिंकतो आणि मी यात अजिबात कॉप्रोमाईज करीत नाही असा पॉलिटिकल फंडा केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मांडला.

भाईंदर पश्चिम येथे केशवसृष्टीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने राजकीय क्षेत्रात करीयर करणाऱया विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या एक वर्षाच्या पॉलिटिक्स कोर्सच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गडकरी यांनी त्यांच्या राजकारणातील ‘यशाची गुरुकिल्ली’ सांगितली. ते म्हणाले, दिल्लीत मोठय़ा टेकडय़ा आहेत पण त्या आपल्यासारख्या नाहीत तर त्या कचऱयाच्या टेकडय़ा आहेत. कचरा म्हणजे वेस्ट आणि तो रिसायकल करून वापरता येतो. तसेच राजकारणात काहीही आणि कोणीही वेस्ट नसतो. त्याचा वापर कधीही होऊ शकतो.  ‘इंडिया इज नॉट नेशन.. इटस् पॉप्युलेशन’ या पंडित नेहरूंच्या  वक्तव्याची त्यांनी यावेळी आठवण करून दिली.

आपली प्रतिक्रिया द्या