मंत्री झालात म्हणजे सरकार काही तुमची खासगी मालमत्ता नाही! शिंदे गटाच्या आमदारांनीच गुलाबराव पाटलांना सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन महिने झाल्यावरही अपेक्षेप्रमाणे काहीच घडत नसल्याने शिंदे गटातीलच आमदारांमध्ये पक्षांतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. मंत्री झालात म्हणजे सरकार काही तुमची खासगी मालमत्ता नाही, अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी जळगाव जिह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सुनावले आहे.

शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील यांनी माध्यमांसमोरच गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली. गुलाबराव पाटील यांनी राजकारणातील शुद्रपणा करू नये. सरकारमध्ये आपण काम करतो तेव्हा ते सरकार बनवण्यामध्ये प्रत्येकाचा वाटा असतो, प्रत्येकाचे योगदान असचे. एक-एक मतावर सरकार येते आणि कोसळते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारसारखे! सर्व मिळून सरकार आले आणि त्यामुळे तुम्ही मंत्री आहात याचे भान ठेवा, असे खडेबोल चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांना सुनावले. यावरून शिंदे गटात सारे काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.