
ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात ‘बीबीसी’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने 2002मध्ये उसळलेली गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ नावाची डॉक्युमेंटरी बनवली आहे. नुकतीच ही डॉक्युमेंटरी प्रसारित करण्यात आली. या डॉक्युमेंटरीद्वारे गुजरात दंगलींमध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याचे पडसाद ब्रिटनसह हिंदुस्थानमध्येही उमटले आहेत.
‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ नावाच्या या डॉक्युमेंटरीमध्ये गोधरा हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेल्या दंगली या घटनांशी संबंधित राजकीय नेते, पत्रकार आणि पीडित लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच गुजरात दंगलीमध्ये अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले, अशाप्रकारचे चित्रण यात करण्यात आले आहे. यामुळे मोठा गदारोळ झाला असून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही यात दाखवण्यात आलेल्या माहितीशी आपण सहमत नसल्याचे म्हटले होते. आता केंद्र सरकारनेही यावर कारवाई केली पंततप्रधान नरेंद्र मोदींवरील ही डॉक्युमेंटरी युट्यूब-ट्विटरवर ब्लॉक केली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने याबाबत निर्देश दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहेत.
दरम्यान, ही डॉक्टुमेंटरी प्रसारित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी यावर आक्षेप घेतला. यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार, बीबीसीची ही डॉक्युमेंटरी यूट्यूब आणि ट्विटरवर ब्लॉक करण्यात आली आहे.
Govt blocks YouTube videos, tweets sharing BBC documentary on PM Modi
Read @ANI Story | https://t.co/PfOOZQLwJZ#YouTube #BBCDocumentary #PMModi #India pic.twitter.com/lRWqr12pYA
— ANI Digital (@ani_digital) January 21, 2023
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बीबीसी डॉक्युमेंटरीच्या पहिल्या एपिसोडचे यूट्यूबवर शेअर केलेले सर्व व्हिडिओ ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. ‘इंडियाः द मोदी क्वेश्चन’ या बीबीसी डॉक्युमेंटरीच्या यूट्यूब व्हिडीओच्या लिंक असलेल्या 50 हून अधिक ट्विट ब्लॉक करण्याचे आदेश ट्विटरला देण्यात आले आहेत. माहिती आणि प्रसारण सचिवांनी IT नियम, 2021 अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून शुक्रवारी याबाबत सूचना जारी केल्या. YouTube आणि Twitter या दोन्ही कंपन्यांनी या निर्देशांचे पालन केले आहे.
Eminent Indians slam BBC documentary on PM Modi, say it’s visibly motivated charge sheet against a patriot
Read @ANI Story | https://t.co/2UcWQrALZC#PMModi #BBCDocumentary #India pic.twitter.com/IqlxcTEGKJ
— ANI Digital (@ani_digital) January 21, 2023




























































