आहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच:  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी 

आपले आरोग्य निरोगी, सदृढ ठेवण्यासाठी आपल्या नियमित आहारात नाचणी, वरी यासारख्या तृणधान्यांच प्रमाण वाढविणे गरजेच असल्याचे मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले. मराठा भवन, जिल्हा परिषद रत्नागिरी जवळ येथे पौष्टिक तृणधान्ये पिकाचे महत्व जनमानसात पोहचविण्यासाठी कृषी विभागाकडून आयोजित पौष्टिक तृणधान्य दिन कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद, रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, उपाध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी संतोष गोवळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवाजी जगताप आदि मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सुनील चव्‍हाण म्हणाले की, “नाचणी, नागली, वरी इ. यासारख्या बारीक तृण धान्यांमध्ये इतर तृणधान्यांच्या तुलनेत जास्त कॅलशियम, फॉसस्फरस, लोह, अमिनो असिड, व्हिटमिनचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे नाचणी, नागली यासारख्या तृण धान्य पिकांकडे कानाडोळा करुन चालणार नाही. तृणधान्यांमधील कॅल्शियम, फॉसस्फरस, लोह, अमिनो ऍसिड, यासारखे घटक आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवितात आणि मधुमेय, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या आजारापासून दूर ठेवतात. त्यामुळे आहारात त्यांचे प्रमाण वाढविणे गरजेच आहे. त्यामुळे पौष्टिक तृणधान्ये पिकाचे महत्व जनमानसात पोहचविण्यासाठीच पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात येत आहे.”

ते पुढे म्हणाले “बाजारात तृणधान्याची मागणी वाढणे गरजेच आहे, तृणधान्यांचा आपल्या आहारातील महत्व जनसामान्यांपर्यंत पोहचविणे गरजेच आहे. त्याचे महत्व सर्वसामान्यांना पोहचविण्यासाठी प्रचार, प्रसार करणे गरजेच आहे.” जनतेला तृणधान्यांचे आहारातील महत्व लक्षात आल्यावर तृणधान्यांची मागणी वाढेल, त्यामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यातून येथील शेतकरी आर्थिकदृष्टया समृध्द होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आहार तज्ज्ञ डॉ. सप्रे यांनी निरोगी आरोग्यासाठी नियमित आहारात तृणधान्य किती  महत्वाचे याचे महत्व पटवून दिले. तृणधान्यात असलेल्या विविध घटकांची व त्यांचा आपल्या शरीरासाठी असलेल्या आवश्‍यकता आदिची माहिती दिली. तसेच आपली पुढील पिढी निरोगी निर्माण होण्यासाठी आहारात तृणधान्यांच प्रमाण वाढविणे गरजेच असल्याचे सांगितले.

डॉ. वाघमोडे यांनी तृणधान्यामध्ये असणाऱ्या विविध घटकांची माहिती देणारी सादरीकरण केले. यावेळी सेंद्रीय शेतमाल प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सेंद्रीय शेती गट लोगो व जनजागृत्तीसाठी लिफलेटचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्यामधील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.