कश्मीर खोरे धगधगतेच, सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीर खोऱयात दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. श्रीनगरच्या ईदगाह परिसरात बुधवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांच्या दिशेने ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱयासह दोघे जखमी झाले. अली मशिदीजवळ झालेल्या या हल्ल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली.

हल्ल्यानंतर मशिदीच्या आवारात सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करूनच हा हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. दहशतवाद्यांनी याआधी सोमवारी बांदिपोरा येथील रहिवासी मोहम्मद इब्राहिम खानची गोळ्या झाडून हत्या केली. खान हा बोरी कादल येथील कश्मिरी पंडिताच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करीत होता. तसेच रविवारी एसडी का@लनी परिसरात तौसिफ अहमद या पोलिसाला गोळ्या घालून मारण्यात आले. कश्मीर खोऱयात गेल्या काही दिवसांत हत्यांचे सत्र सुरू आहे.