Video – मार्च महिन्यात देशवासीयांना दिसणार पाण्यावर धावणारी कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात पाण्यातून निघणाऱ्या ग्रीन हायड्रोजनवर धावणारी कार लवकरच पाहायला मिळणार आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या गाडीबाबतची माहिती दिली. ही गाडी टोयोटा कंपनीची असून 15 मार्चला तुम्हा सगळ्यांना या गाडीतून मी फिरवणार आहे असं आश्वासन गडकरी यांनी सगळ्या पत्रकारांना दिलं आहे.

गुरुवारी पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले की टोयोटा कंपनीची ही गाडी फरीदाबाद येथील इंडियन ऑईलच्या लॅबमध्ये नेण्यात येणार आहे. या लॅबमध्ये या गाडीत ग्रीन हायड्रोजन भरण्यात येणार आहे. यासाठी लागणारी काही उपकरणे अमेरिकेतून यायची असून ती आली की यावर काम सुरू होणार आहे. 15 मार्चला या गाडीत ग्रीन हायड्रोजन भरण्यात येईल ज्यानंतर मी तुम्हा सगळ्या पत्रकारांना या गाडीतून दिवसभर फिरवणार आहे असं आश्वासन गडकरी यांनी दिलं आहे. ग्रीन हायड्रोजन हा पाण्यातून निघत असल्याने या गाडीमुळे प्रदूषण अजिबात होत नाही असे गडकरी यांनी सांगितले.